रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (13:26 IST)

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण

devendra fadnavis
सध्या राज्यात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागणं लागल्याच्या बातमी नंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण लागली असून त्यांनी स्वतःला होम आयसोलेट केले आहे. फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली. 

त्यांनी ट्विट केले की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर औषधोपचार सुरु असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करून घ्यावी.असे लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणत्या नेत्यांची कोरोना चाचणी काय येते या कडे लक्ष आहे.  

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा देशात वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा  वाढत आहे.काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण लागली आहे. राज्यात देखील कोरोनाच्या रुग्णसंख्यते वाढ होताना दिसून आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सामाजिक अंतर राखून मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.