1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (20:14 IST)

धुळे : दरोड्यातील तरुणीच्या अपहरणाचा बनाव उघड

crime
धुळे : साक्री येथे एक धक्कदायक घटना समोर आली आहे. "इस लडकी को साथ मे लेके चलो म्हणत… " साक्री येथे दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 23 वर्षीय तरुणीचे अपहरण करण्याचा बनाव उघड झाला आहे. या घटनेत प्रियकासोबत तरुणीनेच दरोडा, अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , चार दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरात दरोडेखोरांनी दरोडा टाकून 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने लुटले. घरातील तरुणीचे अपहरण केले.
 
साक्रीतील नवापूर रस्त्यावरील भांडणे शिवारात असलेल्या सरस्वती कॉलनीतील ज्योत्स्ना पाटील (40 वर्षे) आणि त्यांची भाची निशा शेवाळे या दोघी घरात टीव्ही पाहत होत्या. त्यांना घराचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. घराचा दरवाजा उघडल्यानंतर सहा दरोडेखोरांनी दोघींना शस्त्राचा धाक दाखवला. कपाटातील तिजोरीतून सुमारे 88 हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. तसेच ज्योत्स्ना पाटील यांचे हातपाय बांधून निशाचे अपहरण केल्याची माहिती समोर आली होती.
 
ज्योत्स्ना पाटील यांचे पती काही कामानिमित्त संगमनेर येथे गेले होते. त्यामुळे निघाला त्यांनी घरी सोबतीला बोलवले होते. निशा व ज्योत्स्ना रात्री जेवण करून गप्पा करत बसल्या असताना रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांच्या हातात बंदूक आणि चाकू होता. अशी माहिती समोर आली होती. पण, हा सर्व बनाव होता हे आता समोर आले असून सर्वांनाच धक्का बसला आहे.
 
याप्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना इंदूरमधून अटक केली असून आणखी चार संशयितांना ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी इको कार व बोलेरो अशी दोन वाहने सुध्दा ताब्यात घेतली आहे. तर तरुणीला मध्य प्रदेशच्या सेंधवा येथून ताब्यात घेतले आहे. विनोद भरत नाशिककर (38, गायत्रीनगर, शाजापूर मध्यप्रदेश) हा प्रियकर असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor