गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (20:51 IST)

फडणवीस आणि खडसे एकाच मंचावर, आणि गर्दीत खडसे पडले एकटे ....

fadnavis eaknath shinde
नाशिकमध्ये  डोंगरे वसतिगृह मैदानावर भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या पहिल्याच दिवशी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे उपस्थित होते.यावेळी फडणवीस आणि  खडसे हे दोघेही एकाच व्यासपीठावर आल्याने सगळ्याचेच लक्षवेधले गेले. 
 
यावेळी मंचावर खडसे काहीसे दूरच बसलेले दिसले. भाजपचे नेते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.  गिरीश महाजन यांच्यासह अनेक भाजप नेते कार्यक्रमाला उपस्थित आहेत. गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांच्यात काही अंतर राखून खडसे बसलेले आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांच्या गर्दीत खडसे एकाकी पडल्याचे पाहायला मिळाले. 
 
एकनाथ खडसे यांनी आपल्या भाषणातून राजकीय विधान करणे टाळले. आम्ही राजकीय विचारांच्या चपला बाहेर सोडून व्यासपीठावर आलो आहोत, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी महानुभाव पंथाच्या विचारसरणीवर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात महानुभाव पंथापासून झाल्याचं सांगितलं.
 
“या राज्यात समृद्धी यावी. चक्रधर स्वामींनी दिलेल्या ज्ञानाप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र राहावं. त्या स्वरुपाचं जीवन आपण एकमेकांनी जगावं. आपसातील मतभेद विसरावेत, धर्मांतील मतभेद विसरावेत” अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या भाषणानंतर एकनाथ खडसे यांनी आपले कट्टर विरोधक असणाऱ्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. व्यासपीठावरच त्यांच्यात काही क्षण चर्चाही झाली.