या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, आगीमुळे एकाच बोगीचे नुकसान झाले. या आगीबाबत सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यार्डसारख्या भागात प्रत्येक ठिकाणी सुरक्षा पुरवणे शक्य नाही तरी देखील अग्निशमन दलाने चांगली कामगिरी करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली आहे.