नागपूर पोलीस आयुक्तांसह 5 अधिकाऱ्यांची बनावट एफबी खाते तयार करून फसवणूक, 4 आरोपींना अटक
पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे, तर 3 आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, या वर्षी फेब्रुवारीमध्ये आरोपीने सीपी सिंगल यांच्या नावाने एफबीवर बनावट खाते तयार केले. या खात्याच्या माध्यमातून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या होत्या.