शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (21:42 IST)

आईच्या जातीवरून मुलाला जात प्रमाणपत्र द्या, जरांगे यांची मागणी

manoj jarange
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. 24 तारखेनंतर एकही तास वाढवून देणार नाही अशी आक्रमक भूमिका जरांगे यांनी घेतली. आईच्या जातीवरून मुलाला जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे.
 
आईच्या जातीवरून मुलाला जात प्रमाणपत्र देण्याबाबत मराठा आरक्षणाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आई ओबीसी किंवा कुणबी असल्यास मुलालाही संबंधित जातीत प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. त्यासंदर्भात उपमितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र कायदेशीर बाबी तपासूनच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचंही सूत्रांचं म्हणणंय. तर दुसरीकडे असा निर्णय घेतल्यास त्याचे पडसाद एससी आणि एसटी जातीतही उमटतील आणि हे त्या जातींनाही मान्य आहे ? असे प्रश्न ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केले आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor