गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (08:15 IST)

अजित पवारांच्या हातात राज्य दिले तर ते चार दिवसात विकून खातील….

हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विविध विषयावरून विधान परिषदेत गोंधळ झाला.त्यामुळे बुधवारचा दिवस चर्चेचा ठरला. या अधिवेशनात परीक्षे संदर्भातील घोटाळा, आरोग्य भरती, एसटीचे प्रलंबित प्रश्न, शाळेच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप यामुळे सभागृहात गदारोळ माजला. दरम्यान अजित पवारांच्या हातात राज्य दिले तर ते चार दिवसात विकून खातील,असे वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
 
एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा टोला लगावला आहे. अधिवेशनाचा पहिलाच दिवस मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सुरुवात झाल्याने भाजपाच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर चांगलाच निशाणा साधला. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने या टीकेला सुरूवात झाली. त्यानंतर प्रसाद लाड,गोपीचंद पडळकर अशा अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका केली.गेले महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ते कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाहीत.
मुख्यमंत्री पदाचा प्रभार उपमुख्यमंत्र्यांना द्यावी अशी चर्चा सुरू होती. यावरून गोपीचंद पडळकर यानी चांगलाच समाचार घेतला. अजित पवार यांच्या हाती जरचार्ज दिला तर ते महाराष्ट्र विकून खातील अशी टिका त्यानी केली. 
ते म्हणाले,परीक्षा संदर्भात सरकार पुरस्कृत रॅकेट आहे. सरकारच्या वतीने गुळमुळीत उत्तर दिले जात आहेत. सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचे मला विशेष वाटले. महाराष्ट्रातील परीक्षेला बसलेली सर्व मुले आणि मुली भारतीय जनता पार्टीचे आहेत का? असा
सवाल त्यांनी उपस्थित केला. आरोग्य भरती घोटाळ्यामुळे टोपे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यानी केली.विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे असे म्हणाले होते तेव्हा लगेच गुन्हे दाखल झाले.
मात्र सत्तेत असणार्‍या मंत्र्यांबाबत कोणताही गुन्हा दाखल होत नाही. आता कोणतीही चौकशी राज्य सरकारने न करता केंद्राने करावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे अधिवेशनासाठी हजर राहू शकले नाहीत. त्यांनी काही काळ घरी बसून विश्रांती घ्यावी, काही काळ मुख्यमंत्रिपदाचा भार आदित्य ठाकरे किंवा अजित पवारांकडे सोपवावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.