शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (09:11 IST)

3 हजाराहून अधिक ग्रामपंचायतीसाठी मतदान

राज्यभरातील 16 जिल्ह्यात आज  ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 3 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. विशेषत: याचा फायदा भाजपला होईल अशी अटकळ बांधली जात आहे.मतदान शांततेत पार पडावं यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही सज्ज आहेत. 

विविध जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींसाठी मतदान असे 

नाशिक – 170 
धुळे – 108
जळगाव – 138
नंदुरबार – 51
औरंगाबाद – 212
बीड – 703
नांदेड – 171
परभणी – 126
जालना – 240
लातूर – 353
हिंगोली – 49  
अमरावती – 262
अकोला – 272
वाशिम – 287
बुलडाणा – 280