कोरोनात इंदोरीकरांच्या कीर्तनाला गर्दी
सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची क्रेझ कायम असल्याचं पाहायला मिळतंय. बीडच्या नांदुरघाट गावात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाला हजारो लोक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या वेळी सोशल डिस्टन्सिंग आणि करोना नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
काही संघटना त्यांच्या कीर्तनात विरोध करत असल्या तरी दुसरीकडे त्यांची लोकप्रियता कायम असल्याचं दिसतंय. शासनाने करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने काही निर्बंध लागू केले आहेत. शाळा, महाविद्यालय बंद असताना दुसरीकडे अशा राजकीय कार्यक्रमाला हजारोची गर्दी करोनाला आमंत्रण देणारी आहे, अशी चर्चा होत आहे. शिवजयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या त्यांच्या कीर्तनाला कोपरगावकरांनी उस्फूर्त गर्दी केली होती.
इतकी गर्दी जमल्यानंतरही पोलिसांनी डोळेझाक केली यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केले होते. इंदोरीकर महाराजांनी सम-विषम तारखांवरुन मुलगा की मुलगी याबाबतचं भाष्य केलं होतं. सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली होती.