मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (10:43 IST)

रायगडमध्ये होम स्टेमध्ये खोली न दिल्याने पर्यटकांनी महिलेला स्कॉर्पिओने चिरडले

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. होम-स्टे रूमच्या भाड्यावरून झालेल्या वादातून हरिहरेश्वरमध्ये पर्यटकांनी एका महिलेवर एसयूव्ही चालवली. यामध्ये गंभीर जखमी महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीवर्धन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. ज्योती धामणस्कर वय 34वर्षे असे मृताचे नाव आहे. सर्व आरोपी पुण्यातील पिपरी चिंचवड येथून हरिहरेश्वर येथे आले होते. तसेच मद्यधुंद पर्यटकांनी चालवलेल्या स्कॉर्पिओ कारने महिलेला चिरडले. मद्यधुंद पर्यटकांना होम स्टेमध्ये खोल्या नाकारण्यात आल्याने वाद सुरू झाला. यानंतर मारामारीची घटना घडली आणि तेथून पळून जात असताना पर्यटकांनी ज्योतीला  कारने चिरडले, त्यात तिचा मृत्यू झाला. हे पर्यटक पुण्यातील पिंपरी चिंचवडचे रहिवासी असून त्यात एका नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे.यानंतर स्थानिक लोकांनी एका पर्यटकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिकरींनी सांगितले की, रविवारी सकाळी श्रीवर्धन पोलिसांनी आणखी दोन आरोपी पर्यटकांना अटक केली. आरोपी पर्यटकांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Dhanashri Naik