गणेशोत्सवासाठी भविष्यात विमानाचीही सोय करू - नितेश राणे
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी विशेष ट्रेन, बसची सोय करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी निलेश राणे आणि भाजपातर्फे मोदी एक्सप्रेस सोडण्यात येते, ती यावर्षीही सोडण्यात येईल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यंदा कोणणात जाणाऱ्यांसाठी बसेस आणि रेल्वेची सोय करण्यात आली आहे. कोकणवासीयांची जेवढी सेवा, भाजपा आणि आमच्याकडून होते आहे, तेवढी दुसरे कोणते पक्ष करत असतील, असं वाटत आहे. सध्या कोकणात बस आणि रेल्वे जातात आहे, पुढच्या काळात बस आणि ट्रेनच नाही तर विमानही सोडू, असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
नितेश राणे म्हणाले, "यंदा कोकणात जाणाऱ्यांसाठी बसेस आणि रेल्वेची सोय करण्यात आली आहे. कोकणवासीयांची जेवढी सेवा, भाजपा आणि आमच्याकडून होते आहे, तेवढी दुसरे कोणते पक्ष करत असतील, असं वाटत नाही. सध्या कोकणात बस आणि रेल्वे जात आहेत, भविष्यात विमानांचीही सोय आम्ही करणार.