1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (09:21 IST)

शिक्षिकेच्या बनावट इन्स्टाग्रामवरून विद्यार्थ्यांना अश्लील मेसेज

cyber halla
कोल्हापूर शहरातील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिकेचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून त्यावरून विद्यार्थ्यांना अश्लील मेसेज पाठविल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पीडित शिक्षिकेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बनावट खाती तयार करणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
 
अज्ञाताने एका शिक्षिकेच्या नावाने इन्स्टाग्रामवर चार बनावट खाती तयार केली. त्यावरून विद्यार्थ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. त्यानंतर एडिट केलेले अश्लील व्हिडीओ, फोटो पाठवून घाणेरड्या शब्दात मेसेज लिहिले. हा प्रकार २५ ते २८ मार्चदरम्यान घडला. थेट शिक्षिकेच्या खात्यावरून अश्लील मेसेज आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली. आपल्या नावाने बनावट खाती तयार करून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार लक्षात येताच पीडित शिक्षिकेने तत्काळ राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन या प्रकाराबाबत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.

Edited by -Ratnadeep Ranshoor