शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कोल्हापुर जिल्ह्यातील 45 हजार शेतकर्‍यांचे पीककर्ज माफ

कोल्हापुर- कोल्हापुर जिल्ह्यातील 45 हजार शेतकर्‍यांनी 31 मार्च 1997 ते 31 मार्च 2007 या काळात घेतलेले पीककर्ज माफ करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. या निर्णयामुळे एकूण 112 कोटी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
या प्रकरणी अब्दुल मोमीन, दिवंगत वीरगोंडा पाटील, विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी लिमिटेड आणि शिवप्रसाद विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी लिमिटेड यांनी अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.