गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (21:03 IST)

बिबट्याचा पोल्ट्री फार्मवर हल्ला, सुमारे 200 कोंबड्या केल्या फस्त

leopard
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील  कासारवाडी परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या वेळी बिबट्याने  एका पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश करत सुमारे 200 कोंबड्या फस्त केल्या आहेत.  गेल्या काही दिवसांपासून कासारवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त वावर दिसून येत असल्याचे शेतकरी सांगत आहे. यातच कासारवाडी येथे वैभव चंद्रकात देशमुख यांची 5 हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी पोल्ट्रीत कोंबड्या टाकल्या होत्या. सद्यस्थितीत कोंबड्यांचे वजन दिड किलोच्या आसपास आहे. रविवारी रात्री बिबट्याने पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश केला आणि कोंबड्यांवर हल्ला केला.
 
बिबट्याने अनेक कोंबड्या फस्त करत तेथून पळ काढला. कोंबड्याचा आवाज ऐकून  शेजारीच राहत असलेले देशमुख यांनी बघितले असता अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे लक्षात आले. यात जवळपास 200 कोंबड्या मृत पावल्या आहे. सकाळी ग्रामस्थांना याबाबत माहिती कळताच माजी उपसरपंच सचिन देशमुख यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. 
Edited by : Ratnadeep Ranshoor