गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (15:14 IST)

शेकोटीसाठी चक्क दुचाकी पेटवली

गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा तखाडा जाणवत आहे. थंडीपासून बचाव ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात येत आहेत. नागपुरात तापमानाचा पारा 7 अंशावर गेला आहे. दरम्यान अशा जीवघेण्या थंडीत पोलिसांपासून लपण्यासाठी शेतात आसरा घेतलेल्या चोरट्यांनी कमालच केली. चोरट्यांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क दुचाकी पेटवल्याचीघटना समोर आली आहे.
 
काही दिवसांपासून नागपुर पोलीस दुचाकी चोरांच्या शोधात होते. पोलीस स्टेशनच्या आवारातून 10 दुचाकी चोरी गेल्या होत्या. या मुळे पोलीस दुचाकी चोरांच्या मागावर असताना चोरट्यांनी चोरी केलेल्या दुचाकी गाड्या एका शेतात लपवून शहराबाहेर आसरा घेतला होता.
 
अखेर पोलिसांनी चोरट्यांचा पत्ता लागला पण जळालेली दुचाकी पाहून त्यांना देखील प्रश्न पडला. यातून नवीनच माहिती समोर आली याचे कारण ऐकून पोलीस देखील अवाक झाले. रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडल्याने चोरट्यांची भयंकर अवस्था झाली असताना बचावासाठी परिसरात लाकडं नसल्यामुळे त्यांनी चक्क हजारो रुपये किमतीची दुचाकी पेटवली. जळून खाक झालेल्या दुचाकी गाडीचा सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
 
या टोळीने शेतात दुचाकी लपवून ठेवल्या होत्या. छोटा सर्फराज याने हे कृत्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस पथक आरोपी छोटा सर्फराजचा शोध घेत असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.