बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 मे 2018 (09:37 IST)

बारावीचा निकाल आज लागणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आज  30 मे 2018 रोजी दुपारी 1 वा जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahresult.nic.in  वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल. बोर्ड 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.

www.mahresult.nic.inwww.result.mkcl.orgwww.maharashtraeducation.comwww.knowyourresult.comwww.hscresult.mkcl.org या आहेत.  वेबसाईटवर निकाल पाहता येईल तसंच गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल. याशिवाय एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवर बीएसएनएल धारकांना निकाल मिळवता येईल.
MHHSC <space> <seat no> हा मेसेज टाईप करुन 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
 


विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाईटवर उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंट आऊट घेता येईल.ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल.