गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2018 (16:28 IST)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2018 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 
 
आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 8 एप्रिल 2018 रोजी तर मुख्य परीक्षा 18 ते 20 ऑगस्ट 2018 दरम्यान होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ची जाहिरात जानेवारी 2018 मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 6 मे रोजी होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा
संयुक्त पेपर क्रमांक एक 26 ऑगस्ट 2018 रोजी, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पोलीस उप निरीक्षक पेपर क्रमांक दोन 2 सप्टेंबर 2018 रोजी, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा राज्य कर निरीक्षक पेपर क्रमांक दोन 30 सप्टेंबर 2018 रोजी व महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा सहायक कक्ष अधिकारी पेपर क्रमांक दोन 6 ऑक्टोबर 2018 रोजी होईल.
 
महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 13 मे रोजी तर मुख्य परीक्षा 8 सप्टेंबर 2018 रोजी होईल.सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2018 पूर्व परिक्षा 20 मे 2018 रोजी तर मुख्य परीक्षा 9 नोव्हेंबर 2018 रोजी होईल. 
 
महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2018 ची जाहिरात मार्च 2018 मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 10 जून 2018 रोजी होईल. महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक एक 14 ऑक्टोबर 2018 रोजी होईल. महाराष्ट्र गट -क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन लिपिक टंकलेखक 21 ऑक्टोबर 2018 रोजी होईल. महाराष्ट्र गट -क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क 4 नोव्हेंबर 2018 रोजी होईल आणि महाराष्ट्र गट -क सेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन कर सहायक 2 डिसेंबर 2018 रोजी होईल.
 
महाराष्ट्र वन सेवा परीक्षेची जाहिरात मार्च मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 24 जून रोजी तर मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर 2018 रोजी होईल. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात एप्रिल मध्ये प्रकाशित होणार असून पूर्व परीक्षा 8 जुलै रोजी होईल. महाराष्ट्र यांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 17 नोव्हेंबर रोजी असून, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबर रोजी व महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 25 नोव्हेंबर रोजी होईल. महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षाची मुख्य परीक्षा 15 डिसेंबर रोजी होईल.
 
महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब प्रशासन शाखा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची जाहिरात मे 2018 मध्ये प्रकाशित होणार असून मुख्य परीक्षा 4 ऑगस्ट रोजी होईल. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची जाहिरात मे मध्ये प्रकाशित होणार असून मुख्य परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होईल.
 
संबंधित परिक्षांचा अभ्यासक्रम, परिक्षा पध्दती आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व अद्ययावत करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकात कोणताही बदल होऊ शकतो. त्याची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे आयोगाचे उप सचिव सुनिल अवताडे यांनी कळविले आहे.