गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (10:57 IST)

महाराष्ट्र बंद: बसेसची तोडफोड, सोलापूरात युवा सेनेची टायर जाळून बंदची सुरुवात

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज (11 ऑक्टोबर) 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिलीय. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं हा एक दिवसीय बंद पुकारला आहे.
 
राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. सोलापूरात युवा सेनेच्या वतीनं संगम येथे टायर जाळून बंदची सुरुवात झाली आहे.
 
महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी बीड शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेनं सकाळीच रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेकडून व्यापाऱ्यांना गुलाबाचं फुल देऊन आपली आपली दुकान बंद करण्याच आवाहन करीत आहेत. बेस्टच्या आठ गाड्या व भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड
 
धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या आठ गाड्या व भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोडच्या घटना उघडकीस आल्या आहेत. कोल्हापुरात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत असून सकाळपासूनच भाजी मार्केट, दुकाने बंद आहे. 
 
इकडे ठाणे परिवहन सेवा (टीएमटी) बंद असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ होत असून ऑफिस गाठण्यासाठी रिक्षा, टॅक्सीकडे धाव घेत आहे.