Maharashtra Marathi Breaking News Live Today: लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुकीत काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण, पक्षाने ते मान्य केले नाही. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा तीव्र झाल्या होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. अशा परिस्थितीत आता पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, मला प्रदेशाध्यक्षपदात रस नाही. सध्या सुरू असलेल्या कोणत्याही चर्चेची मला माहिती नाही. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
08:50 AM, 16th Jan
महायुतीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी राज ठाकरेंचे नाव का घेतले, आमदारांना दिला हा संदेश
08:50 AM, 16th Jan
मुंबईत पेट्रोल-डिझेलवरील वाहने धावणार नाहीत! उच्च न्यायालयाने सरकारला हे निर्देश दिले