गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 8 जानेवारी 2023 (17:07 IST)

1993 प्रमाणे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

arrest
मुंबई एटीएसने रविवारी एका व्यक्तीला अटक केली. त्याने मुंबई एटीएस नियंत्रण कक्षाला फोन करून शहरात 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रमाणे बॉम्बस्फोट घडवून येत्या दोन महिन्यांत येथे दंगल घडवून आणण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. 55 वर्षीय नबी याह्या खान उर्फ ​​केजीएन लाला असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एटीएसने त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

अशाच आणखी एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज 29 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. शहरातील एका लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये बॉम्ब असल्याबाबत त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला (पीसीआर) फसव्या कॉल केल्याचा आरोप आहे. व्हीपी रोड पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी पहाटे 3 वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केला आणि दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.
 
बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (बीडीडीएस) आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, परंतु त्यांना परिसरात काहीही संशयास्पद आढळले नाही. ज्या क्रमांकावरून कॉल करण्यात आला होता, त्या नंबरचा पोलिसांनी शोध घेतला, असे त्यांनी सांगितले. तासाभरात आरोपीचा शोध लागला. प्राथमिक तपासानुसार आरोपी हा मानसिकदृष्ट्या विकलांग व बेरोजगार आहे. अधिकारी म्हणाले, रेस्टॉरंटच्या बाहेर त्याच्यासोबत असे काही घडले ज्यामुळे त्याने बनावट कॉल केला.त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by - Priya Dixit