रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 मे 2017 (17:16 IST)

मनमाडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या

मनमाडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून पाच महिन्याच्या गर्भवती तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्गा प्रमोद गरुड असे तरुणीचे नावं आहे. मनमाड शहरातील संभाजीनगर भागातील घटना असून एक वर्षापूर्वीच दुर्गाचे लग्न झाले  होते. कार खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा पती सतत तगादा लावत होता तिचा मानसिक छळ केला जात होता. त्यांच्या जाचाला कंटाळून दुर्गाने गळफास घेऊन जीवन संपवले. मयत दुर्गाचे वडील वाल्मिक गंगाधर आढाव (रा.डोंगरगाव ता. शिल्लोळ,जि. औरंगाबाद) यांनी मनमाड पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मयताचा पती प्रमोद गरुड व सासू विरुद्ध गुन्हा दाखल करून पतीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी दिली.