गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (12:09 IST)

'त्या' 6 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा, मनसेची याचिका

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी मनसेनं केलेली याचिका कोकण भवन आयुक्तांनी दाखल करून घेतली आहे. या याचिकेची सुनावणी होईपर्यंत 6 नगरसवेकांच्या नवीन गटाला मान्यता दिली जाणार नसल्याचं कोकण भवन आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षांच्या याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ६ नगरसेवक अधिकृतरित्या मनसेचेच राहतील असा दावा मनसेनं केला आहे. दरम्यान, कोकण भवन आयुक्तांनी ही याचिका दाखल करुन घेतल्यानं शिवसेनेला मात्र, मोठा धक्का बसला आहे.