रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मार्च 2017 (09:12 IST)

मुंबई महापालिकेला 8 मार्चला नवीन महापौर मिळणार

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आता   8 मार्चला निवडणूक होणार आहे. यापुर्वी 9 मार्चला महापौरपदाची निवडणूक होणार होती मात्र, महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर तारीख बदलण्यात आली आहे.  महापौरपदासाठी उमेदवारीचा अर्ज 4 मार्च रोजी भरता येणार आहे. तर निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 8 मार्च काही तास आधी अर्ज मागे घेता येणार आहे.   2012 साली निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत 8 मार्च रोजी संपत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीच्या दिवशी ते तांत्रिकदृष्ट्या पदावर असतील. मात्र, त्यांना या निवडणुकीत भाग घेता येणार नाही.