बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (13:16 IST)

नांदेडच्या कोचिंग सेंटर मध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, संतप्त लोकांनी कोचिंग सेंटर तोडले

gang rape
सध्या देशात महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे. महाराष्ट्रात देखील बदलापूरच्या प्रकरणाने राज्य हादरले आहे. आता नांदेडच्या एका कोचिंग सेंटर मध्ये शिक्षकाने एकाअल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर संतप्त लोकांनी आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कोचिंग सेंटरची तोडफोड केली.या प्रकरणात कोचिंग सेंटरच्या शिक्षकाला अटक केली आहे. 

सदर घटना नांदेडच्या चैतन्यराजे  संभाजी चौक, येथे एका कोचिंग क्लास मध्ये घडली आहे. या कोचिंग सेंटर मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येतात. कोचिंग सेंटरच्या एका शिक्षकाने शिकवणी घ्यायला येणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित मुलीने या प्रकरणाची वाच्यता घरी केली. 

या वर कुटुंबियांना संताप झाला आणि त्यांनी कोचिंग सेंटर गाठले. घटनेची माहिती मिळाल्यावर अजून लोकं  जमा झाले आणि संतप्त लोकांनी कोचिंग सेंटरची तोडफोड केली.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  घटनास्थळी स्थानिक नेते देखील आले. पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते कोचिंग सेंटर पोहोचले आणि त्यांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून त्याच्या विरोधात विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे लोक चांगलेच संतापले असून आरोपी शिक्षकाला कडक शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. 
Edited by - Priya Dixit