शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (08:47 IST)

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला, अन्यथा जनता धरणे आंदोलन करणार

मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा पुढे ढकल्याचा निर्णय घ्या. अन्यथा ९ ऑक्टोबरला राज्यातील जनता धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा मेटे यांनी दिला आहे. 
 
मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.  
 
याशिवाय कोरोना परिस्थीतीत कोचिंग क्लासेस आणि अभ्यासिका बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होत नाही. परीक्षेसाठीची साधने उपलब्ध नाहीत.  कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोण जबाबदार, या मुद्द्यांकडे मेटे यांनी लक्ष वेधलं आहे आहे.