गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2017 (11:41 IST)

आता वाहतूक पोलिसांच्या छातीवर वायफाय कॅमेरा

मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांच्या छातीवर वायफाय कॅमेरा लावण्यात येणार आहे. यंत्रणेत पारदर्शकता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  या कॅमेऱ्यात रस्त्यावरील पोलिसाचं प्रत्येक वाहनचालकांसोबतचं संभाषण रेकॉर्ड केलं जाईल आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग होईल.

सुरुवातीला शहरात 100 कॅमेऱ्यांची चाचणी घेतली जाईल. या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओ क्लिप एडिट करता येणार नाही, जेणेकरुन छेडछाडीची शक्यता कमी असेल, असं वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

सध्याच्या घडीला, वाहतूक विभागाकडे हायड्रोलिक व्हॅन असून ज्यात कॅमेरा आणि मेगा फोन आहेत. एखादं वाहन टोईंग करताना त्यावरुन घोषणा केली जाते. या कॅमेऱ्यामुळे वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.