गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जुलै 2023 (10:19 IST)

Nagpur : अंगात साप येणाऱ्या भोंदूबाबाचं स्टिंग ऑपरेशनमुळे भिंग फुटलं

Nagpur News :  सापाचं नाव जरी काढलं की अंगाचा थरकाप उडतो. साप चावल्यावर त्यावर वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे. साप चावल्यावर आज ही अनेक गावात रुग्णालयात न जाता एखाद्या अघोरी बाबा कडे लोक जतात. हे भोंदूबाबा भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक करतात आणि रुग्णाचा जीव धोक्यात घालतात. अंधश्रद्धेमुळे लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम हे भोंदूबाबा करतात. असाच काहीसा प्रकार नागपूरच्या रामटेक तालुक्यात कट्टा गावात घडला आहे. 

वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीने कट्टा गावात स्टिंग ऑपरेशन करून अंगात साप येणाचा  दावा करणाऱ्या एका भोंदूबाबाच भिंग फोडलं आहे. 

सर्पदंशावर उपचार करण्याचा दावा करणारा हा भोंदू बाबा सापा सारखा हिस्स हिस्स आवाज काढतो आणि सापा सारखा जमिनीवर रेंगाळून चालतो त्याचा अंगात सापाचा संचार होतो असा दावा हा बाबा करतो. त्याने सर्पदंशावर उपचार देखील केल्याचे सांगतिले आहे.या सर्व प्रकाराची माहिती वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोयायटीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी हा सर्व प्रकार बघण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले. 
या साठी समितीच्या एका कार्यकर्त्याने आपल्या हातावर टाचणी ने साप चावल्याचे घाव करुन बाबाकडे जाऊन सर्पदंश झाल्याचे सांगितले.  

त्या बाबाने तरुणाच्या अंगातून सापाचं विष तोंडाने ओढण्याचा दावा केला. तुला एका विषारी सापाने दंश केला होता आता मी तुझातले सर्व विष माझ्यात घेतले आहे. आता मलाही अस्वथ वाटत आहे.मी विष उतरवून टाकले आहे. अशा प्रकारे स्टिंग ऑपरेशन करून या भोंदूबाबाची फसवेगिरी उघडकीस केली आहे. 

या भोंदू दाबाने गावातील भोळ्या लोकांची गेल्या महिन्यात फसवणूक केल्यामुळे तीन लोक्कांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेकांना सापाच्या विषामुळे व्याधी झाल्या आहे. या भोंदूबाबाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत वाईल्ड वेल्फेअर सोसायटीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit