शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (10:33 IST)

राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित : बापट

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असून, त्याचा शिवसेना-भाजप युतीवर कोणताही परिणाम होणार नाही. युती मजबूत आहे आणि सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास राज्याचे नागरी अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केला. 
 

मंत्री बापट म्हणाले, 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर आरोप असले, तरी ते निर्दोष ठरतील. त्यानंतरच त्यांचा मंत्रिमंडळ प्रवेशाचा निर्णय होईल.' कर्जमाफी योग्य शेतकऱ्यालाच मिळावी, यासाठी सरकार आग्रही असल्याने लाभार्थ्यांची यादी तपासण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास उशीर होत असल्याचे मंत्री बापट यांनी सांगितले.