शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (11:27 IST)

Nashik Flood :नाशिकात पुरात एक जण वाहून गेला

सध्या राज्यात पावसाचे जोर असल्यामुळे नाशिकात वालदेवी नदीला पूर आला आहे.या नदीपात्रात एक जण वाहून गेल्याची बातमी मिळाली आहे.गोदावरीला देखील पूर आला आहे. नदीकाठावरील नागरिकांना दक्ष राहण्यास सांगितले आहे.नाशिक मध्ये दोन दिवसापासून पावसाने झडी लावली आहे.इथे सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरणांतील पाण्याची पातळी देखील वाढली आहे.त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.गंगापूर धरणाचे 2500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
 
पावसामुळे नदीला पूर आला आहे.या पुरामध्ये पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे दाढेगावातील  एक व्यक्ती वाहून गेल्याचे समजले आहे.पूल पार करताना ही घटना घडली आहे.वालदेवी नदीवर हा पूल असून धोकादायक झाला आहे.या पुलावरून पार्थडी,पिंपळगाव,दाढेगावातील नागरिक येजा करतात.या पुलावर पाणी भरल्याने येजा करण्याचे मार्ग बंद होतात. नागरिकांनी नवीन पूल बांधण्याची मागणी केली आहे..