शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जून 2023 (20:55 IST)

नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नाशिकमध्ये सिंधी समाजाचा निषेध मोर्चा

Jitendra Awhad
सिंधी समाजाबद्दल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ नाशिक शहरासह, नाशिकरोड, देवळाली कॅम्प येथील सिंधी समाजाने एकत्र येत आव्हाड यांचा जोरदार निषेध करीत मोर्चा काढला.
शालिमार येथील हनुमान मंदिराजवळ सकाळी 11 वाजता सर्व सिंधी समाजाचे बांधव जमा झाले. डोक्यावर जय झुलेलाल अशी लाल टोपी परिधान करून प्रत्येक बांधवाने दंडाला काळी फित बांधली होती. 12 वाजेच्या दरम्यान जय झुलेलाल अशा घोषणा देत मोर्चा2काढण्यात आला.

मोठ्या संख्येने सिंधी समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. हातात जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाचे फलक घेऊन मूक मोर्चाने ही मंडळी निघाली. पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना समाजाच्या शिष्ट मंडळाने निवेदन दिले.
आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी समाजाने केली आहे. असव्हड यांच्या निषर्धात देवळाली कॅम्प येथील दुकाने दोन तास बंद ठेऊन निषेध करण्यात आला. शालिमार येथीलही समाजाची दुकाने बंद होती.
Edited By-Ratnadeep Ranshoor