मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

Anjaneri Fort अंजनी माता मंदिर

Anjaneri Fort
Hanuman Birth Place Anjani Mata Mandir Trimbakeshwar Nashik अंजनेरी किल्ला हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. या पर्वतावर अंजनी मातेने 108 वर्षे तप केले आणि वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाल्याची लोकांची श्रध्दा आहे. या कारणास्तव या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाल्याचे समजले जाते. अंजनेरी फाट्यावर जवळचं गावातील हनूमान मंदिर आहे. 
 
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावात 16 पूरातन मंदिरे आणि शिलालेख पाहाता येतात. यातील 4 मंदिरे हिंदु देवतांची असून 12 मंदिरे जैन देवतांची आहेत. येथे 108 जैन लेणी आहेत.
 
अंजनेरी गावातून पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. वाटेतच जैनधर्मीय लेण्या दिसून येतात. पठारावर पोहोचल्यावर अंजनी मातेचे मंदिर आहे. अंजनी देवीच्या मंदिरासमोर एक तलाव दिसते. तलावाला हनुमान तलाव आणि इंद्र कुंड या नावाने ओळखले जाते. हनुमानाने या ठिकाणी पाऊल ठेवले होते त्यामुळे तलावाचा आकार पाऊलाप्रमाणे आहे अशी लोकांची श्रध्दा आहे. दंतकथेप्रमाणे हनुमानजी लहान असताना जेव्हा सूर्याला फळ समजून खायला निघाले तेव्हा त्यांनी डाव्या पायाने उंच उडी घेतल्यामुळे हा तलाव निर्माण झाला आहे. बारकाईने तलावाकडे पाहिल्यावर समजते की डाव्या पायाचे निशाण आणि त्याची बोटं सूर्याच्या दिशेने आहे.
 
समोर गेल्यावर अंजनी मातेची गुफा लागते. असे म्हटले जाते की अंजनी मातेने शिवाकडे पुत्र व्हावे म्हणून तपश्चर्या केली व त्यानंतर हनुमानाचा जन्म झाला. येथे अंजनी मातेच्या कुशीत असलेल्या हनुमानजींची अशी एकमेव मूर्ती आहे.
 
पठारावर एक तलाव असून येथून वेतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहता येतो.
 
कसे पोहचायचे
12 ज्योतिर्लिंगा पैकी एक त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्राहून अंजनेरी किल्ला 3 किलोमीटर अंतरावर आहे. अंजनेरी गावातून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे दोन तास लागतात.