सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2023 (12:41 IST)

NIA ने मुंबई आणि पुण्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले, 4 ISIS समर्थकांना ताब्यात घेतले

NIA
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी मुंबई आणि पुण्यातील 5 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान इस्लामिक स्टेटच्या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
NIA ने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने राज्यात छापे टाकले आहेत. ISIS संदर्भात NIA ने हा छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने मुंबई आणि पुण्यातील 4 ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने आज मुंबईत 2, भिवंडीत 2 आणि पुण्यात एका ठिकाणी छापे टाकले आहेत. हे छापे अजूनही  (वृत्त लिहिपर्यंत) सुरू आहेत. 28 जून रोजी एनआयएने मुंबईच्या नागपाडा भागात राहणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता, ज्याच्यावर ISIS च्या संपर्कात असल्याचा आरोप होता.