शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (17:28 IST)

नितेश राणे यांनी प्रफुल्ल पटेल आणि राज्यपाल यांच्या भेटीचे ट्विट रिट्वट केले

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी प्रफुल्ल पटेल आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीचं ट्विट रिट्वट केल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्या असून, तर्कविर्तक लावले जात आहेत.राज्यात राष्ट्रवादींच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
 
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह यांची २ मे रोजी भेट घेतली होती. सुळे यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतल्याचं सांगण्यात आलं. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या भेटीपाठोपाठ आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली. पटेल आणि राज्यपालांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ पटेल यांनी भेट घेतल्यानं या भेटींची चर्चा होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पटेल-राज्यपाल भेटीचं ट्विट रिट्विट केलं आहे. त्यामुळे या भेटी नेमक्या कशासाठी होतं आहे? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.