बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जुलै 2020 (09:19 IST)

नागपूरकर सुधरा, दोन-तीन दिवसांची मुदत, अन्यथा कडक लॉकडाऊन होणार- मुंढे

नागपूरकरांनी त्यांचे बेजबाबदारीने वागणे थांबवले नाही, तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन करणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेला आहे. दोन-तीन दिवस निरीक्षण करणार, असं तुकाराम मुंढेंनी सांगितलं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुंढेंनी नागपूरकरांशी संवाद साधलेला आहे. पहा काय म्हणाले…
 
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला बेजबाबदापणे वागणारे नागरिक कारणीभूत आहेत. जर शासनाने घातलेल्या  नियमांचे पालन होणार नसेल, तर नागपुरात लॉकडाऊनसोबतच कडक संचारबंदी लागू करावी लागेल, असे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. शिवाय, दोन-तीन दिवस परिस्थितीचे निरीक्षण करुन त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. 
 
बेजबाबदार नागरिकांमुळे 100% नियमांचे पालन होत नसल्याने नागपुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जर नागरिकांकडून हे थांबले नाही, तर दोन-तीन दिवस परिस्थितीचं निरीक्षण करून पुढील निर्णय घ्यावे लागणार आहेत असे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेले आहे. महानगर पालिकेचा मुख्य उद्देश हा कोरोना रुग्ण संख्येत घट करणे हाच आहे. मात्र, नागरिकांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने परिस्थिती कशी नियंत्रणात येईल, असा सवालही मुंढेंनी उपस्थित केलेला आहे.