1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (08:20 IST)

नुतन मराठा महाविद्याल प्रकरण : प्राचार्य देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला

नूतन मराठा महाविद्यालयात खोटे मस्टर तयार करतांना ज जि मविप्र अध्यक्ष विजय भास्करराव पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए बी वाघ, शिवराज मानके, पी ए पाटील यांना रंगेहात पकडले होते.या प्रकरणी रितसर फिर्याद देऊन तसेच मास्टर ताब्यात घेऊन गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
 
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयात बसून ७ जण एका रजिस्टरमध्ये २०१७ पासून आजपावेतोच्या सह्या करीत होते. स्व.नरेंद्र अण्णा पाटील गटाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी धडक देत ते रजिस्टर ताब्यात घेतले होते.
 
या प्रकरणी प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख यांच्यासह उपप्राचार्य एबी वाघ, शिवराज मानके,पी ए पाटील यांनी जळगाव न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता आज जळगाव न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.