बस रायगडमध्ये बस दरीत कोसळली, 13-14 जण मृत्यूमुखी पडल्याची भीती
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागच्या घाटामध्ये खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातात 13-14 लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती असल्याचं बचाव पथकातील कर्मचाऱ्याने पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे. या बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. या घटनेत 20 ते 25 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या बस मध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव येथील कार्यकर्ते होते. हे सर्व पुण्यात शुक्रवारी झालेला कार्यक्रम संपवून परत जात असताना ही घटना घडली आहे. ही बस तब्बल 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अपघातग्रस्ताच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली आहे. खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्सनाही मदतीसाठी बोलावण्यात आलं आहे.
या खाजगी बसमध्ये बाजी प्रभू वादक गट (झांज पथक) गोरेगाव येथील लोक होते. ते पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरगावला परत चालले होते.