खरी शिवसेना शिंदे यांचीच असा निकाल येऊ शकतो, आठवले यांचे भाकीत  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल निवडणूक आयोग देऊ शकतो, असं भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणावर आले आहेत. 2/3 आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे असल्याने शिवसेना पक्षाची मान्यता आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना मिळेल, असंही आठवले यांनी सांगितलं. आठवले हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
				  													
						
																							
									  
	 
	रिपब्लिकन पक्ष आम्हाला अजून वाढवायचा आहे. आमच्या पक्षाला राज्यात एक मंत्रिपद मिळावं ही आमची मागणी आहे. 12 आमदारांच्या यादीत आम्हाला देखील स्थान मिळायला हवं, असं ते म्हणाले. 2024 मधील निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील. भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. घराणेशाही विरोधात मोदी काम करत आहेत. अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
				  				  
	 
	शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला. त्यांच्या अपघातावर काही लोकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. ओबीसी समाजला देखील राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.