सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (22:32 IST)

मुक्त विद्यापीठ प्रमाणपत्रं डिजिलॉकरच्या माध्यामातून देणार

भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आता त्यांची पदवीची प्रमाणपत्रं डिजिलॉकर सुविधेच्या माध्यमातुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायूनंदन यांच्या हस्ते डिजिलॉकरचे उद्घाटन करण्यात आले.पहिल्या टप्प्यात गेल्या दोन वर्षातल्या २ लाख 90 हजार विद्यार्थ्यांना डिजिलॉकरद्वारे प्रमाणपत्रं उपलब्ध होणार आहेत.उर्वरित पदवी प्रमाणपत्रंही टप्प्याटप्प्याने दिले जातील.ही प्रमाणपत्रं मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना 
http://digilocker.gov.in या वेबसाईटवर किंवा डिजिलॉकर अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल. आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे त्यात नोंदणी करता येईल.इतर माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रं डिजिटल स्वरुपात उपलब्ध होतील.