शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (08:03 IST)

पाकिस्तान कनेक्शन उघड, NIA ची नागपूरमध्ये धाड!

नागपूरमध्ये NIAने धाड टाकल्याची मोठी बातमी सध्या समोर आली आहे. नागपूरच्या सतरंजीपुरा तसेच हंसापुरी भागात ही कारवाई करण्यात आली आहे. दि. २३ मार्च रोजी सकाळी पहाटे चार वाजताच ही धाड टाकण्यात आली आहे. ‘गुलाम मुस्तफा’ ही ‘जमात ए रजा मुस्तफा’ या संघटनेच्या माध्यमातून काहीतरी देश विघातक कारवाई करत असल्याची माहिती NIA कडे होती. त्यासंदर्भात अधिक तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपूरात दाखल झाले. याच बडी मशीद परिसरात अहमद रझा वल्द मोह आणि अख्तर रझा वल्द मोह यांची चौकशी NIA केली आहे.पाकिस्तानातील काही व्यक्तींशी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चॅट केल्याच्या प्रकरणातून पहाटे चार वाजता त्यांच्या घरी जाऊन एनआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच माहितीवरुन ही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
या प्रकरणातून नागपूरमध्ये दोघांचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले असून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. या छाप्यादरम्यान नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी देखील हजर होते. तसेच कोणचाही अनुचित प्रकार घडू नये साठी परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आले आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor