1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 14 जुलै 2018 (15:56 IST)

पंचगंगेला जोरदार पूर अनेक गावांचा संपर्क तुटला

मागील ७ दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पडणाऱ्या कोसळधारा पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी आता पात्रा बाहेर वाहत असून जोरदार पूर आला आहे. यामुळे जिल्ह्यातील 63 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. सोबतचा पाच राज्यमार्ग आणि 13 जिल्हामार्गावरी वाहतूक अंशत: बंद केली असून धीम्या गतीने करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. शहरात सखल भागांत पाणी साचून ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले होते. जिल्ह्यात पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल 51 बंधारे पाण्याखाली गेले. या पावसाने पंचगंगा नदी दुसयांदा पात्राबाहेर आली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 16000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहरातील भाजी मंडयाही ठप्प होऊन नागरिकांची गैरसोय झाली. शहरातील रोजचे कामकाज मंदावले आहे. तर पूर बघायला गर्दी करू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.