रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: लोणावळा , बुधवार, 10 मे 2017 (17:23 IST)

पवना धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू

लोणावळ्याजवळील पवना धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.पोहण्यासाठी पाण्यात उतरलेले असताना दोघांचा ही दुर्घटना घडली.
 
मुंबई आणि मुंब्र्यातून आठ मित्र पिकनिकसाठी पवना धरण परिसरात आले होते. हे सर्व जण पवना धरणा-या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते.
 
यावेळी साजिद सलाम अली शेख आणि अब्दुल रहमान बादशाह या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 
 
या दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.