गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पंतप्रधान मोदी मौनीबाब: खर्गे

भीमा- कोरेगाव घटनेचे पडसाद संसदेतही उमटल्याचे दिसले. लोकसभेत विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेसने याप्रश्नी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. ज्या-ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे तिथे ‍दलितांवर अत्याचार होतो, असा आरोप काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
 
समाजात दुही माजवण्यासाठी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे लोक असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा यामागे हात आहे. पंतप्रधानांनी याप्रश्नी संसदेत बोलावे. ते या विषयावर गप्प राहू शकत नाहीत. अशा प्रसंगी ते मौनीबाबा असतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.