उंची वाढवण्यासाठी लावले पाच रुपयांचे नाणे
औरंगाबादमध्ये सध्या ग्रामीण विभागाची पोलीस भरतीमध्ये सुरु आहे. यावेळी एका उमेदवारानं तळपायाला चक्क पाच रुपयांचं नाणं लावलं. पोलीस अधिकाऱ्यांना एका उमेदवाराच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी या तरुणाची तपासणी केली, यावेळी पायाला नाणं लावून उंची वाढवल्याची बाब उघड झाली आहे.पायाला नाणं लावत भरती प्रक्रियेवेळी फसवणूक केल्याप्रकरणी तरुणाविरोधात सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.