महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांची पोलीस हेल्पलाईन सुरु
सध्या देशात महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रकरण वाढत आहे. महाराष्ट्रात देखील महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होणे थांबत नाही आहे.
राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महिलांना आपत्कालीन तातडीनं मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी पोलीस हेल्पलाईन सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्याचे महिला बाल अपराध प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आदेश दिले आहे.
राज्यातील बदलापूर अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणी महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाने महिला आणि मुलीं पर्यंत पोलीस यंत्रणांच्या मार्फत मदत मिळावी या साठी पोलीस हेल्पलाईन सुरु केली आहे.
महिलांनी आपत्कालीन स्थितीत पोलिसांची मदत घेण्यासाठी 8976004111, 8850200600, 022-45161635 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Edited by - Priya Dixit