1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:36 IST)

आमदार प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, भेट राजकीय भेट नसल्याचे सांगितले

भाजपाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची  कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. प्रसाद लाड हे जवळपास पाऊण तास राज ठाकरे यांचं निवासस्थानी होते. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. भेटीनंतर कृष्णकुंजमधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. 
 
“मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचा पक्षाचा निर्धार आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही वैयक्तिक होती, असं त्यांनी सांगितलं. माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध आहेत, असं लाड म्हणाले. मात्र त्याचबरोबर “शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी शक्य ते सर्व करु,” म्हणत लाड यांनी शिवसेनेला इशाराही दिला.