बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2024 (11:11 IST)

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

rain
महारष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. हवामान विभागानुसार रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगांव, नाशिक, कोल्हापूर, अहमद नगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह 50 आणि 60  किमी प्रति तास गतीने वारे वाहतील. तसेच पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णता वाढण्याची शक्यता आहे.   
 
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची काही शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील बुलढाणा, वाशीम, वर्धा सोडून बाकी जिल्ह्यातील वादळ वाऱ्यासह पावसाची शकयता आहे. तर मराठवाडयातील अधिक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट तसेच हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 
 
कोकणामध्ये उष्णतेची लाट येऊ शकते. तर  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये काही जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह-विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या रदरम्यान वारे 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वाहतील. 
 
राज्यातील काही भागांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पुण्याजवळील काही भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 

Edited By- Dhanashri Naik