राज्यात पावसाला सुरुवात ,या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

rain
Last Modified सोमवार, 20 जून 2022 (16:28 IST)
राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर कोकणातील काही भागात हलका ते मध्यम पावसाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस नसल्यानं शेतकरी काळजीत आहे. शेतकऱ्यांनी खरीपच्या पेरणीची तयारी सुरु केली असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

राज्यात ठाणे, मुंबई, पालघर अंधेरी, चर्चगेट, खार येथे पावसाने हजेरी लावली असून वातावरण गार झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे .

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या काही तासात राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट सांगण्यात आला आहे. हवामान खात्यानं गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यात कमी अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, ठाणे, मुंबई, नागपूर, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हवामान खात्यानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढेल.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

एकनाथ शिंदेंची घोषणा : 75 वर्षांवरील नागरिकांना राज्यात ST ...

एकनाथ शिंदेंची घोषणा : 75 वर्षांवरील नागरिकांना राज्यात ST बसचा प्रवास मोफत
Senior Citizens ST Bus Travel Free: वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ...

Mumbai :CNG सहा रुपयांनी तर PNG चार रुपयांनी स्वस्त

Mumbai :CNG सहा रुपयांनी तर PNG चार रुपयांनी स्वस्त
मुंबई महानगर गॅस लिमिटेडकडून इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये ...

राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर ४६ हजार कोटींची मालकी कुणाकडे?

राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर ४६ हजार कोटींची मालकी कुणाकडे?
बिग बुल राकेश झुनझुनवालाने खूप मोठे साम्राज्य मागे सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा ...

रुपी बँक पुणे बाबत खासदार बापटांनी दिले सहकार मंत्री अमित ...

रुपी बँक पुणे बाबत खासदार बापटांनी दिले सहकार मंत्री अमित शहांना पत्र
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुणेस्थित रुपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. ...

Gondia :गोंदियामध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 50 हून ...

Gondia :गोंदियामध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 50 हून अधिक प्रवासी जखमी
Maharashtra Gondia train accident: महाराष्ट्रातील गोंदियामध्ये रेल्वे अपघाताची घटना समोर ...