राज ठाकरे यांची मदतीच्या घोषणा जाहीर करणाऱ्यांवर टीका
सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मेळाव्यात मनसे प्रमुख यांनी मदतीच्या घोषणा करणाऱ्यावर घणाघात केला.काही लोक जाहीर करतात पुणे शहरासाठी मी 50 हजार कोटी जाहीर करतो, आहे काही का तुमच्या कडे द्यायला.? उगाच मोठ्या घोषणा करू नका. असं मनसे प्रमुख यांनी टीका केली.
ते म्हणाले मनसेच्या हद्दीतील ग्राम पंचायतीला माझ्याकडून पाच लाखाचा निधी देण्यात येईल. तसेच त्यांनी स्वच्छतेचा कान मंत्र देखील दिला.ते म्हणाले आपली गावे स्वच्छ ठेवा. आपला परिसर स्वच्छ करायला पैसे लागत नाही. इच्छाशक्ती लागते. स्वच्छता ठेवल्याने रोगराई मुक्त होते. मी महाराष्ट्रातील अनेक गावात गेलो तिथे स्वच्छता नव्हती. सांडपाणी वाहत होते, लहान मुले त्यात फिरत होती, डुक्कर देखील तिथे फिरत होते. खूपच अस्वच्छता पसरली होती.
मनसेच्या हद्दीतील स्वच्छ असणाऱ्या गावांना मी पाच लाख रुपये बक्षीस देईन.मला वाटेल तर जास्त पण देईन. माझं इतरांसारखे नाही. हातात काही नाही आणि 50 हजार कोटी देणार. आहे का तुमच्या कडे? जे वाटेल ते बोलायचं. तुमच्या आवाक्यात असेल ते करा.नाही तर गप्प् बसा उगाच का बुडबुडे फोडायचे.महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडण्याच्या वेळी मी स्वच्छतेचा विषय मंडल होता.
राज ठाकरे यांनी सरपंच , ग्राम पंचायतच्या सदस्यांना मोलाचा सल्ला दिला. त्यांनी आपले गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
Edited by - Priya Dixit