राज ठाकरे दिल्लीत, मनसे भाजप युतीची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री चार्टर विमानाने दिल्लीला रवाना झाले. आज दिल्लीत महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीत गेले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन भाजपच्या नेंत्यांना भेटणार आहे. आज 11 वाजेच्या सुमारास अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे.
आज दिल्लीत भाजप आणि मनसेच्या युतीच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण मुंबई लोकसभाची मतदारसंघाची जागा भाजप कडून मनसे साठी सोडली जाण्याची चर्चा होती. आजच्या बैठकीमुळे दोन्ही पक्षातील युती बाबत काही महत्त्वपूर्ण घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या युतीसाठी अमित शाह फडणवीस आणि ठाकरे समोर काय प्रस्ताव ठेवतात हे लवकरच समजेल.
Edited by - Priya Dixit