रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (19:47 IST)

राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, जाणून घ्या काय आहे जळगावातील खटल्याचे पूर्ण प्रकरण

मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी यासाठी केलेल्या आंदोलनानंतर मनसे राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती व त्याचे पडसाद जळगावात उमटले होते याप्रकरणी 21 ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरेंसह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत राज ठाकरे यांना न्यायालयाने वॉरंट देखील बजावला होता व त्यानंतर पंधरा हजारांचा जामीन मंजूर करून या खटल्यात गैरहजर राहण्याची परवानगी न्यायालयाने राज ठाकरे यांना दिली होती. या सुनावणीअंती जळगाव न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह तत्कालीन प्रदेश सरचिटणीस एड.प्रकाश बाविस्कर जिल्हाध्यक्ष एड. जमील देशपांडे, पदाधिकारी रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी 2008 मध्ये रत्नागिरीतल्या खेडमध्ये राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसे पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात आज राज ठाकरे यांच्यासह मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस अॅड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
 
मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी, यासाठी मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद 21 ऑक्टोबर 2008 रोजी संपूर्ण राज्यासह जळगावतही उमटले होते. याप्रकरणी राज ठाकरेंसह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.